Womens' Day Celebration
यावर्षी महिला दिना निमित्त काहीतरी वेगळे करायचं होते. आपण ट्रेकिंग करतो पण ज्यांना आवड आहे पण सवड नाही किंवा तशी संधी नाही मिळत अशा ladies कुठंतरी ट्रेकिंग ला न्यायचा विचार डोक्यात घर करू लागला. आणि Thirsty Rovers ट्रेकिंग क्लब च्या रायगड ट्रेक बद्दल समजले. मग काय आई ला तयार केले बाकी सर्व आपोआप जमून आले :प बघता बघता फुल्ल ladies टीम तयार..! वय वर्ष दीड ते साठ वयोगटातील १९ महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.
१९ मार्च २०१७ ला महिला विशेष ग्रुप निघाला रायगड ला... सकाळी ४.४५ ला प्रवासाचा श्री गणेशा करून, सर्व ट्रेकर्स ला पिकउप करत गाडी निघाली शहराबाहेर..!! सर्वांची ओळख झाली मग सुरु झाले गेम्स,अंताक्षरी. हळू हळू सगळे मिक्स होऊ लागले. सकाळ चा गार वारा, मुळशी धारणा चं विहंगम दृश्य , Tahmini घाटाची नागमोडी वळणे, ललित ने दाखविलेला कॅमल बॅक चा नजारा डोळ्यात साठवून आम्ही पोहचलो रायगड च्या पायथ्याला...! स्वादिष्ट उपमा फस्त करत टीम सज्ज झाली ट्रेक साठी. यावेळी आम्ही सर्वात सोपा मार्ग निवडला रोपे वे चा..! रोपे वे मध्ये बसून सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेत सगळे गडावर पोहचले. प्रत्येक ठिकाणाचा इतिहास ललित कडून समजून घेत आम्ही राणीचा महाल, गंगा सागर, नगारखाना दरवाजा, महादरवाजा, सिंहासन, बाजार पेठ, जगदीश्वर मंदिर, शिवाजी महाराज यांची समाधी, वाघ्या ची समाधी आणि टकमक टोक असे गड दर्शन केले.. कुठेही न रडता, हट्ट न करता ज्या स्पिरिट ने लहान मुलींनी (वेदिका, समिधा आणि परी) गडप्रवास केला तो अवर्णनीय आहे. यात महिला हि कुठं मागे नव्हत्या....कसलीच कुरबुर नाही, कटकट नाही.
संपूर्ण गडाचा प्रवास आनंदाने, एकमेकांना साथ देत, सेल्फी - फोटो काढत आणि शिवाजी महाराज कि जय च्या घोषणा देत यथासांग पूर्ण केला. मराठी भोजनाचा आनंद घेऊन परतीचा प्रवास सुरु झाला. रात्री येताना तोच उत्साह गाणी म्हणताना आणि उखाणे घेताना जाणवला. आनंदाचा क्षण म्हणजे Surprise गिफ्ट म्हणून दिलेले तुळशी चे रोप. आज सर्वाना काहीतरी हरवलेले मिळाले याचा आनंद होता. सकाळी जे बोलत नव्हते आता ते छान मित्र झाले होते. हीच मज्जा असते ना आयुष्याची....वय, नाती हे सर्व विसरून सगळे एकत्र येतात आणि धम्माल करतात हे मी आज अनुभवले.
या गड प्रवासात खूप काही गवसले.... हे गड किल्ले आपले वैभव आहे, त्याला प्रग्लभ इतिहास आहे, आपल्याला तो जपायचा आहे, संपूर्ण जगाला सांगायचं आहे. सर्वाना काहीतरी वेगळे करायचं आहे पण संधी नाही मिळत, प्रत्येक क्षण संधी समजून जगायचे आणि असेच परत ट्रेक ला जायचं हे सर्वानी ठरवले. सर्व महिला (उत्साही ट्रेकर्स), फ्रेंड्स, त्यांच्या फॅमिली, संपूर्ण प्रवासात साथ दिलेले आमचे ७ नवीन-जुने मित्र आणि ट्रेक organizers Thirsty Rovers सर्वांचे मी मनापासून आभार मानते.