HARISHCHANDRAGAD TREK

हरिशचंद्र गड ट्रेक आणि कॅम्पिंग : ३१ डिसेंबर २०१६, वेळ सकाळी ६.३०, मोबाइलची रिंग वाजली, समोरून आवाज आला "आज हरिशचंद्रला जायचं आहे, येणार का?" मी पटकन उठून बसले हळूच पाहिलं तर आई कामात होती आणि पप्पा पेपर वाचत होते, एकंदरीत एवढ्या short नोटीस वर मला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरून मी जरा नाराजीनेच "नाही जमणार रे प्रवीण.." सांगितले...!😢

खरंतर हरिशचंद्र म्हणजे ट्रेकर्स साठी पर्वणीच...महाराष्ट्राचं तिसरं उंच शिखर तारामती, प्राचीन केदारेश्वर व हरिश्चंद्रेश्वर मंदिरं, अभ्येद्य कोकणकडा, नजर जाईल तिथ पर्यंत पठार आणि सळसळणारे गवत, मध्येच वाहणारे छोटे झरे, बेभान वारा, चुलीवरचं पिठलं भाकरी आणि कुंडामधील थंड गार पाणी. हे सर्व आपल्या उरात सामावून घेत ताठ मानेने आजही तसाच उभा आहे हा इतिहासाचा जिवंत साक्षीदार !⛳️🏔️

माझी एक संधी तर हुकली, दरवर्षी प्रमाणे मार्च महिन्यात TCS चा cleanliness drive-हरिश्चंद्र ट्रेक झाला नाही.... मला तर वाटले आता कसला होतोय हा ट्रेक🤔😐 आणि देवकुंड च्या ट्रेक मध्ये परत हरीश #Harish च प्लॅंनिंग झालं..!! पुढील बैठकीत "जयश्री यावेळी तू Lead कर" असे म्हणत सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखविला. ट्रेक च संपूर्ण नियोजन करायला संदीप, मदन, चेतन, किशोर दादा आणि टीम ने मला मदत केली.

नियोजन झालं, mails गेले आणि वन विभागाची बातमी झळकली की गडावर राहायला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे गडाचे सौंदर्य, पावित्र्य धोक्यात आले आहे. आम्ही सर्वांनी या निर्णयाचं स्वागतच केले👍

पण आता कसं करायचं? ट्रेक तर करायचा आहे, एका दिवसात खाली येणे शक्य नाही. मग त्याच वेळी भास्कर ने एक मध्यमार्ग सुचवला. तोलार खिंडीतुन गड सर करायचा, कोकणकडा पाहायचा आणि पांचनाई जवळ हपाटा पठारावर कॅम्पिंग, दुसऱ्या दिवशी पांचनाई, लव्हाळे मार्गे तोलार खिंडीतून परत खिरेश्वर असं ठरलं. रस्ता तसा नवीन होता... पण खडतर आव्हन नसेल तर त्या ट्रेक ला मज्जा नाही😜

९ डिसेंबर २०१७ ला शनिवारी पहाटे सुरु केलेला ट्रेक खिरेश्वर - तोलार खिंड - मंदिर - कोकणकडा अगदी ठरलेल्या वेळेआधी पूर्ण झाला...👍☺️

कोकणकडा वर जेवण करून कॅम्पसाईट कडे प्रवास सुरु झाला ; ४५ अंशाच्या कोनातून, धबधब्याच्या वाटेवरून...! दहावी-बारावीचा पेपर ज्या एकाग्रतेने दिला नाही तेवढी एकाग्रता या संपूर्ण वाटेवर मी अनुभवली. कारण 'नजर हटी दुर्घटना घटी' असा काहीसा हा रस्ता😎. किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग, जंगल, दगड-धोंडे, मावळतीकडे जाणारा सूर्य आणि पटापट फिरणारे घड्याळाचे काटे....दोन तासाचा हा परतीचा ट्रेक करून आम्ही उतरलो ते भाताच्या खाचरात 😊 एकदाचा भास्कर दिसला आणि आमचा जीव भांड्यात पडला😉🏃 पण picture अभी बाकी है मेरे दोस्त...असे म्हणावं लागेल असचं झालं पुढे...अजून तर कॅम्प साईट आलीच नव्हती😂 घोर निराशा...😐🙃

परत 1 तास अंधारात विजेरी🔦 घेऊन पायपीट करत एकदाचे आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो😎 सगळे फारच दमले होते, फ्रेश होऊन सर्वांनी कढी भात, वरण, मटकी आणि भाकरी चा आस्वाद घेतला..😋 आता परत सगळे सज्ज झाले शेकोटी, तंबू आणि मज्जा मस्तीसाठी. काय मैफिल जमली होती...सुंदरच!!! गाणी आणि त्याला बासरीची साथ🎵🎼⛺️, हलकं धुकं, गार वारा त्यात त्याचे वेगळेचं सूर, नवीन मित्र मैत्रिणी ☺️🏕️

अशी संध्याकाळ कुणाला नको असेल ??😍 CCD वाले म्हणतात की a lot can happen over a coffee... मी म्हणेल a lot can happen over 'Trek'😍😇 कोईम्बतूर वरून वेळ काढून आवर्जून ट्रेक ला आलेला अष्टपैलू मित्र प्रवीण, warmup एक्स्पर्ट आणि health concious अचल, शांत व सर्वांची काळजी करणारा अनूप, 'दादा' हे नाव सार्थ ठरवणारे व मदतीला सदैव हजर असणारी मदन-पुजा ची जोडी, शेवटी राहून लोकांना प्रोत्साहित करणारा तसेच बासरी वाजवून "हे पण येतं का तुला? OMG" असे लोकांनी कौतुक केलेला स्वप्नील...!

माझे ट्रेक मध्ये मित्र फार लवकर बनतात पण मैत्रिणी क्वचितच 🤓पण हा ट्रेक याला अपवाद आहे 😉 कारण मला एक नवीन मैत्रीण भेटली - राधिका ! मला तर नेहमीच वाटतं जे बंध ट्रेकिंग,कॅम्पिंग जुळतात ना, ते दुसरीकडे शक्य नाही...!

डिसेंबर चा महिना असल्याने कुडकुडणारी थंडी होती. पाय थरथर कापत होते, रात्री काही केल्या झोप लागली नाही. कारण sleeping बॅग नव्हती नेली..😐🤕 मग काय परत शेकोटी जवळ बसून, आकाशातील तारे पाहत मस्त गप्पा मारल्या😁🌌

सर्वांत सुखद धक्का तर उजाडलं तेव्हा बसला. 🌄श्वास रोखून पाहिलं तर काय जणू कोकणकडाच समोर उभा..टेन्ट च्या पलीकडे...😍मी तर दोन्ही फुफुस्स तुडुंब भरतील एवढा Oxygen भरून घेतला😂😝 सकाळी सर्वजण खूप उत्साही वाटले, कालचा थकवा तर पळूनच गेला कुठे. सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. नाश्ता केला आणि परतीचा प्रवास सुरु झाला. आणखी एका नव्या वाटेवरचा... मजल दरमजल करत, जीप चा प्रवास, २ तासांचा ट्रेक करत, भास्कर ने बनवलेला स्वादिष्ट उपमा फस्त करत आम्ही पुन्हा तोलार खिंडीला पोहचलो.🏔️

इथे आम्ही भास्कर आणि मारुती यांचा निरोप घेऊन खिरेश्वर कडे उतरलो....गरमागरम जेवण करून बस पुण्याकडे निघाली.🚃 या ट्रेक ची खासियत म्हणजे आमच्या बसच्या ड्रायव्हर्स ने दोन्ही दिवस न थकता केलेला ट्रेक, छोटा मित्र 'हरी' (कुत्र्याचं पिल्लू)🐕 याने पूर्ण केलेला ट्रेक,१५ पेक्षा जास्त लोकांचा आयुष्यातील पहिला ट्रेक..! या सर्वांचं मनापासून कौतुक👍 #KeepExploring

ट्रेक यशस्वी तर झाला पण त्याची अनपेक्षित पावती बस मध्ये मिळाली, जेव्हा लोकांनी आयोजकांचे आणि 'जयश्री' चे नारे देत भरभरून कौतुक केले.😎

#ThankYou

दोन दिवस, ३० किलोमीटर्स पेक्षा जास्त चालणे, सर्व सिमकार्डस् आऊट ऑफ कव्हरेज असताना, स्वतः ला स्वतः ची ओळख करून देणारा वेळ...गडवाटा स्वच्छ करायचा प्रयत्न, उन्हवारा झेलत, नवीन अनुभव देत, सपाट जमीन, जंगल, धबधबे, दगडं यातून वाट काढत केलेला हा अविस्मरणीय गडप्रवास...!⛳️🏔️ कुणीतरी म्हंटले आहे की

"There is a moment in every race. A moment where you can either quit, fold, or say to yourself, 'I can do this.'" And that’s how you keep going...

#TCSAdventureClub #हरिश्चंद्रगड #DreamTrek #Harishchandragad #Trekking #MyTeam #Toughest #NewRoutes #NewFriends #Camping #NewExperiences #RealAdventure #Thanks☺️☺️


photo of author Jayashree

The Author : Ms.Jayashree Lembhe an IT Engineer, is an enthusiast in Trekking, tree plantation activies and other cultural activities.


IMAGES

harishchandragad treckking group

Harishchandragad Treckking Group

Harishchandragad Treckking

Harishchandragad Treckking

Harishchandragad

Harishchandragad

Camp

Camp Site